अहमदनगर: अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयसमोरच राजरोसपणे सुरू असलेल्या सुगंधी तंबाखुच्या गोडावूनवर बुधवारी (दि.२२) रोजी छापा टाकला.
या छाप्यात अन्न व औषध प्रशासनाने सुमारे ५२ हजार ६९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गोडावून सील केले आहे. याबाबत नावेद तांबोळी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाला याविषयी सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजीय शिंदे (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी ही कारवाई केली.
नावेद तांबोळी (रा. डावरेगल्ली) याच्या ताब्यात ही सुगंधी तंबाखू आढळून आली.
राज्य सरकारने बंदी घातलेल्या सुगंधी गुटखा, मिक्स पद्धतीने तयार केलेली सुगंधी तंबाखू आदी मुद्देमाल येथे आढळून आला.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी हे गोडावून सील केले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.