रुरल डॉक्टर लीगमध्ये अकलूजचा संघ विजयी

लोणी काळभोर : पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या “रुलर डॉक्टर प्रीमिअर लीग (RDPL) २०२०” या सलग चौथ्या वर्षी भरवलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये “द रॉयल नाईट अकलूज” या डॉक्टरांच्या संघाने विजेतेपद मिळवले.
यावर्षी डॉक्टरांच्या अकोले, चाकण, मंचर, वाघोली, साडेसतरानळी, कारेगाव- रांजणगाव, दौंड, केडगाव, उरुळीकांचन, भिगवण, टेंभुर्णी, अकलूज, जुन्नर, माळशिरस, फलटण, पुरंदर, शिक्रापुर येथील २० संघांनी भाग घेतला होता
संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अकलूज आणि भिगवण ह्या दोन संघात अंतिम सामना खेळला गेला. दहा षटकाच्या  सामन्यात अकलूज संघाने प्रथम फलंदाजीत ७८ धावा करत आणि उत्कृष्ट गोलंदाजीवर भिगवन संघाला ५२ धावांवर रोखले , अशा रोमहर्षक सामन्यांमध्ये ‘द रॉयल नाईट अकलूज’ या संघाने बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरले. आणि भिगवण  संघाने उपविजेतेपद पटकावले तर
पुरंदर संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मालिकावीर पुरंदर संघाचे डॉ. जयदीप चांदगुडे झाले.
तर भिगवण संघाचे खेळाडु डॉ. महेश गाढवे हे सर्वोत्कृष्ट गोलंदाज व डॉ. विशाल जाधव सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले.
‘आरडीपीएल २०२० वुमन्स कप’ या महिला संघासाठी घेतलेल्या सामन्यात पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या महिला संघाने विजयश्री खेचून आणली. अश्या प्रकारे PHDA चा मोटो ‘जगवा आणि स्वतः ही जगा, तंदुरुस्त राहा आणि जीवनाचा आनंद घ्या” हा उद्देश सफल झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिगवण मेडिकल असोसिएशन चे गव्हर्नर डॉ. एल. जी. शाह  व अध्यक्ष डॉ. संकेत मोरे, सामाजिक कार्यकर्ते चांद शेख, PHDA चे अध्यक्ष डॉ. राहुल काळभोर , सेक्रेटरी डॉ. रतन काळभोर,  खजिनदार डॉ नितीन मटकर कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन चौधरी , उपाध्यक्ष डॉ. नागेश गवते ,  RDPL अध्यक्ष डॉ.ओंमकुमार हलिंगे , उपाध्यक्ष डॉ. आनंदकुमार लखपती व सेक्रेटरी डॉ. रणजीत म्हसवडे उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुर्व हवेली डॉक्टर असोसिएशन चे सर्व पदाधिकारी , सदस्य व डॉ. सुनील गायकवाड, डॉ.प्रविण धर्माधिकारी , डॉ. नितीन तांदळे, डॉ. शशिकांत रासकर,  डॉ. संदिप महामुनी, डॉ. विकास बनसोडे, डॉ. गजानन चेके, डॉ. अजय गायकवाड,  डॉ. अमीथ गुप्ता , डॉ. विशाल मुंढे, डॉ. श्रीकांत लोकरे ,डॉ.अनिल देशपांडे, डॉ अभयकुमार नलावडे, दत्ता कामठे, मोतीराम शिंदे यांनी सामने संपेपर्यंत मेहनत घेतली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा