टी ट्वेंटी विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या नवीन जर्सीचं लॉन्च

पुणे, १९ सप्टेंबर २०२२ : मागील काही दिवसापासून भारतीय क्रिकेट संघाची जर्सी बदलणार असल्याची चर्चा सुरू होती. बीसीसीआयने रविवारी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघासाठी ‘टी-ट्वेंटी जर्सीचं अनावरण केलं आहे .भारतीय संघाच्या जर्सीचा निळा रंग कायम राहिला असला. तरी यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. ‘विश्वचषकासाठी’ लॉन्च करण्यात आलेल्या जर्सीवर तीन स्टार आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत तीन विश्वचषक जिंकले आहेत. त्यामुळे जर्सी वर तीन स्टार आहेत. २०२० पासून भारतीय संघाची जर्सीचे स्पॉन्सर एमपीएस स्पोर्ट्स आहेत. त्यांनीच ही नवीन जर्सी बनवली आहे.

बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नवीन जर्सी परिधान केलेला खेळाडूंचा फोटो शेअर केला आहे. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, आणि महिला संघातील सदस्य हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग, यांचा समावेश आहे.

मागच्या विश्वचषकात देखील भारतीय संघ वेगळ्या जर्सीत मैदानात उतरला होता. तसेच आता ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वर्ल्डकप साठी पुन्हा एकदा भारतीय संघ नवीन जर्सी परिधान करणार आहे.

बीसीसीआयने नुकतेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी पंधरा सदस्य टीम इंडियाची घोषणा केली होती. टी ट्वेंटी विश्वचषक १६ऑक्टोबर पासून सुरु होणार असून अंतिम सामना १३ नोव्हेंबरला होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा