कौशल्य विकासासाठी रतन टाटांची दहा हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई: केवळ भारतातीलच उद्योग जगात नव्हे तर पूर्ण विश्वात यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे रतन टाटा हे नेहमीच त्यांच्या सामाजिक कार्यातील गुंतवणुकीसाठी व कार्यासाठी ओळखले जातात. जगातील तब्बल १४० देशांमध्ये टाटा समूह कडून रोजगार उपलब्ध केले जातात ही एक भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. इतकेच नव्हे तर ज्या इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केली आज त्यांच्या देशांमध्ये म्हणजेच इंग्लंडमध्ये रतन टाटा हजारो लोकांना रोजगार देत आहेत.

भारतामध्ये तर त्यांच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेच परंतु आता त्यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. रतन टाटा आता राज्य सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम साठी १०,००० कोटी रुपये देणार असल्याचे घोषित केले आहे. या माध्यमातून तरुणांना औद्योगिक प्रशिक्षण व ज्ञान देण्यात येणार आहे ज्यामुळे त्यांच्यातील कौशल्यांना व कलागुणांना वाव मिळणार आहे. या माध्यमातून हजारो तरुण रोजगार मिळवण्यासाठी सक्षम होणार आहेत. सध्या बेरोजगारी ही एक मोठी समस्या भारतासमोर उभी आहे. ते सोडवण्यासाठी रतन टाटांनी घेतलेले हे पाऊल नक्कीच उपयोगाचे ठरणार आहे.

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा कौशल्य विकासाची कामे:

सीआयआयच्या इंडिया स्किल्स रिपोर्ट नुसार भारताची १.३ अब्ज लोकसंख्येपैकी ६२ टक्के लोक १५-५९ वर्षे वयोगटातील आहेत. जागतिक बँकेचा अंदाज आहे की भारत दरवर्षी १५ ते २९ वयोगटातील १२ दशलक्षाहून अधिक तरुणांना आपल्या कार्यशील प्रवाहात जोडेल. ही आकडेवारी भारताच्या मानवी भांडवलाच्या आकारास अधोरेखित करीत असताना, जागतिक बँकेच्या अहवालात असेही दिसून आले आहे की भारताच्या एकूण २.3 टक्के कर्मचार्‍यांनी औपचारिक कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले असून लाखों लोक रोजगारासाठी प्रतीक्षेत आहेत.

बेरोजगारी आणि रोजगार यातील दरी भरून काढण्यासाठी औद्योगिक कौशल्याची व प्रशिक्षणाची गरज आहे आणि हेच काम टाटा ट्रस्टच्या कौशल्य विकास पोर्टफोलिओचा च्या माध्यमातून केले जात आहे. या माध्यमातून देशातील स्पर्धात्मकता आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या मुख्य उद्देशाने शिक्षण आणि व्यावहारिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी कार्य केले जाते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा