मुंबई : प्रसिद्ध इंग्रजी शब्दकोश ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये दरवर्षी अनेक भारतीय इंग्रजी शब्दांचा समावेश केला जातो. ऑक्सफर्डने आपल्या यंदाच्या आवृत्तीमध्ये देखील अनेक भारतीय शब्दांचा समावेश केला आहे.
ऑक्सफर्डने आपल्या नवीन आवृत्तीमध्ये आधार, चाळ, डब्बा, हडताळ आणि लग्न यासारख्या २६ नवीन भारतीय शब्दांचा समावेश केला आहे. आता ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या १० व्या आवृत्तीमध्ये ३८४ भारतीय इंग्रजी शब्द आहेत.
समावेश करण्यात आलेल्या २६ भारतीय इंग्रजी शब्दांपैकी २२ शब्द प्रिटेंड डिक्शनरीमध्ये आणि इतर ४ शब्द डिजिटल आवृत्तीमध्ये समावेश करण्यात आले आहेत. छापील डिक्शनरीमध्ये बस स्टँड, डिम्ड युनिव्हर्सिटी, एफआयआर, नॉन व्हेज, रिड्रेसल, टेम्पो, ट्यूबलाइट, व्हेज, व्हिडिओग्राफी इत्यादी शब्दांचा तर डिजिटल डिक्शनरीत करंट (वीजेचा), लूटर, लिटिंग आणि अपजिल्हा या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
नव्याने लाँच करण्यात आलेल्या नवीन आवृत्तीमध्ये चॅटबोट, फेक न्यूज आणि मायक्रोप्लास्टिक सारख्या १००० नवीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे.