मुंबईच्या लोकलमध्ये लागली मराठी पाटी

मुंबई: मुंबईमध्ये रेल्वे संबंधी सूचना हिंदी किंवा इंग्लिश मध्ये असल्याने अनेक प्रवाशांना या सूचना समजणे अवघड जात होते. याची दुसरी बाजू अशी होती की मराठी भाषा प्रेमींना आपल्याच भाषेमध्ये येथे सूचना नसल्याने ते खटकत होते. झालेल्या या गैरसोयीची प्रशासनाने दखल घेतली आहे.

मात्र प्रशासनाकडे ही मागणी कोणतेही आंदोलन न करता एक वेगळ्या पद्धतीने करण्यात आली होती. अलार्म फलक मराठी भाषेत नसल्याने लोकलमध्ये ‘इथे मराठी हवीच’, असे स्टिकर्स लावण्यात आले होते. हे स्टिकर्स कोणी लावले, याबाबत अनभिज्ञता असली, तरी राज्यातच मराठी भाषेची होत असलेली उपेक्षा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली होती. आंदोलन न करता स्टिकर लावणाऱ्या अज्ञात मराठी भाषाप्रेमीच्या गांधीगिरीचे कौतुकही झाले. अखेर रेल्वेनेही या मराठी भाषाप्रेमीच्या माणगीची दखल घेतली.

लोकलमधील अर्लामचे सूचना फलक फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत होते. त्याविरोधात अलार्मच्या सूचना फलकावर अज्ञातांनी ‘इथे मराठी हवीच’, असे स्टिकर लावले होते. हे स्टिकर्स चर्चेचा विषय ठरत होते. अखेर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत मराठी संदेश असलेले अलार्म फलक लोकलमध्ये लावण्यात आले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा