कोबी ब्रायंट ची कारकीर्द

जगातील महानतम खेळाडूं मध्ये कोबीचा समावेश होत होता. बॉस्केटबॉलमधील जादूगार मानल्या जाणाऱ्या कोबी ब्रायंटच्या मृत्यूमुळे संपूर्ण क्रीडा विषयांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोबीने २०१५ मध्ये बास्केटबॉलला एक प्रेम पत्र लिहले होते. या प्रेम पत्रावरून डिअर बास्केटबॉल हा एक शॉट अ‍ॅनिमेटेड चित्रपट तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ठ अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला होता.

जगातील सर्वात महान खेळाडूंमध्ये कोबीचा समावेश होतो. २० वर्षाच्या करिअरमध्ये कोबीने पाच वेळा एनबीए चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले होते. बास्केटबॉलमधील अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवणाऱ्या कोबीने एका पत्राद्वारे ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. कोबीने १८ वेळा एनबीएचा ऑल स्टार हा किताब मिळवला होता.

२००८ बिजिंग आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. २००६ मध्ये टोरांटो रॅपटर्सविरुद्धच्या सामन्यात कोबीने एका सामन्यात ८१ गुण मिळवले होते. त्याच्या करिअरमधील ही सर्वोत्तम खेळी होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा