फलटण येथे सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

फलटण, सातारा ८ ऑगस्ट २०२३ :
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सुब्रोतो चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन दि.३ ऑगस्ट २०२३ रोजी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, तसेच नितीन ताराळकर जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य गंगवणे बी.एम, नूतन प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी सुजित पाटील, विनोद खुडे, नितीन भोंसले, महादेवराव माने, क्रीडा मागदर्शक प्रा.स्वप्निल पाटील, प्रा.तायप्पा शेंडगे तसेच मुधोजी हायस्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख सचिन धुमाळ हे उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये १४ व १७ वर्षाखालील मुले व मुली सहभागी होणार आहेत. या तीन वयोगटातून जवळजवळ ५० ते ६० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धा माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुल, फलटण व मुधोजी महाविद्यालय फलटण या दोन क्रीडांगणावर दि. ३ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२३ पर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेचे सामने सकाळ सत्रात व दुपार सत्रात पार पडणार आहेत.

या स्पर्धेतील प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून विजेत्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

या स्पर्धेसाठी सातारा व फलटण मधील अमित काळे, अक्रम मेटकरी, मोनिल शिंदे ,सत्यजीत मोरे, संकेत चव्हाण, गौरव काठाळे हे क्रीडा तज्ञ पंच म्हणून कामगिरी पाहणार आहेत.

या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी फुटबॉल प्रशिक्षक अमित काळे, संजय फडतरे, बी बी खूरंगे, कुमार पवार, सुहास कदम तसेच सर्व सीनियर फुटबॉल खेळाडू काम पाहत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा