झोपडपट्टी ते ऑस्कर…ऑस्कर ते दारिद्र्याचा काळोख…

28

मुंबई: मुंबईच्या झोपडपट्ट्यांपासून ऑस्कर पुरस्कारांपर्यंतचा प्रवास करणारा अझरुद्दीन इस्माईल पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोहोचला आहे. डॅनी बॉयलच्या ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार्‍या बाल अभिनेता अझरुद्दीनने चित्रपटात काम केल्यामुळे त्यांना खूप नाव मिळवून दिलं परंतु ते टिकवण्यात तो अपयशी ठरला आणि पुन्हा एकदा दारिद्र्याच्या गडद काळोखाचा सामना त्याला करावा लागत आहे.

वास्तविक, ८ ऑस्कर जिंकणार्‍या स्लमडॉग मिलियनेयरच्या जबरदस्त यशानंतर दिग्दर्शक डॅनी बॉयलने ‘जय हो’ नावाचा ट्रस्ट तयार केला. या ट्रस्टचा उद्देश चित्रपटाचे बाल कलाकार अझर आणि रुबीना कुरेशी यांना मदत करणे हा होता. ही दोन्ही मुले मुंबईच्या झोपडपट्टीत राहत होती पण जय हो चॅरिटेबल ट्रस्टमुळे दोन्ही मुलांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न झाला आणि दोन्ही बाल कलाकारांना ट्रस्टकडून फ्लॅट व मासिक भत्ते मिळू लागले.

स्लमडॉग मिलियनेयरच्या १० वर्षांनंतर अझरने सांताक्रूझमध्ये आपला फ्लॅट विकला आहे आणि पुन्हा एकदा झोपडपट्टीत राहत आहे. अलिकडच्या काळात या कलाकारांनी केवळ त्यांची लोकप्रियता गमावली नाही तर त्यांचे भांडवलही गमावले आणि वांद्रे पूर्वच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. याप्रकरणी मुंबई मिररने अझरच्या आईशी खास संवाद साधला. अझरची आई शमीमा म्हणाली की उदर निर्वाहासाठी करत असलेल्या व्यायसायात त्याला खूप नुकसान झाले आहे.

आपल्या मुलाला ड्रग्स आणि इतर वाईट सवाई लागल्या आहेत, असेही शमीमाने सांगितले. त्या म्हणाला की ‘तो बर्‍याच वेळा आजारी पडत असे. मी गेली तीन वर्षे धडपडत आहे. मी त्याच्या उपचारांवर बराच खर्च केला आणि मग आमच्याकडे घर विकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या पुढे म्हणाल्या, ‘अझर १८ वर्षांचा होता तेव्हा ट्रस्टच्या वतीने मासिक भत्ता देणे बंद केले. ते जवळपास ९००० रुपये पाठवत असत. आता आम्हाला घर चालविणे खूप अवघड झाले आहे. वांद्रे पूर्वेकडील नौपाडा खोलीत अझरचे कुटुंब राहते. त्याची बहीण, बहिणीचा नवरा आणि त्यांची तीन मुलेही या खोलीत राहतात.

अझरची सहकलाकार रुबीना कुरेशीही तिच्या फ्लॅटपासून विभक्त झाली आहे. २० वर्षीय रुबीना एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि नालासोपारा येथे तिच्या आईबरोबर राहते. ती फॅशन डिझायनिंगचा कोर्सदेखील करत आहे. यावेळी त्या फ्लॅटमध्ये रुबीनाचे वडील आपली दुसरी पत्नी व मुलांसमवेत राहत आहेत. रुबीनानेही या संदर्भात आपले मत मांडले आहे.

ती म्हणाली, ‘स्टारडम संपला आहे. आता मला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमवावे लागतील. मुंबई हे खूप गर्दीचे क्षेत्र आहे आणि हे खूप प्रदूषित आहे. माझा जन्म झोपडपट्टीत झाला पण मला तिथे कधी जायचे नाही. ती म्हणाली, “मी या घरात चार वर्षे वास्तव्य केले होते परंतु त्या फ्लॅटमध्ये ८ लोकांसह राहणे खूप कठीण होते, म्हणून मी तेथून बाहेर पडले. ही ट्रस्ट आता अधिकृतपणे बंद झाली आहे परंतु ते अद्याप माझ्या संपर्कात आहेत. ट्रस्ट अजूनही मला थोडीफार मदत करत आहे.