काल पुण्यामध्ये अचानक आलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसाच्या या धुमाकूळाने पुणेकरांना स्वताचा जीव मुठीत घेऊन घरी जावे लागत होते.
या सर्व प्रकरणात एकिकडे पुणेकरांना पावसला तोंड देता देता त्यांच्या नाकी नऊ येत होते तर त्यात भर टाकली ती पुणे प्रशासनाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाने. नाला कोरडा आणि रस्ता जलमय असे चित्र काल वारजे येते समोर आले, पावसाच्या पाण्याने नाले दुथडी भरून वाहतात पण काल संध्याकाळी नाल्याच्या ऐवजी रस्त्यावर पाणी वाहत होते आणि नाला मात्र कोरडा होता. त्यामुळे पुणेकरांना चांगलीच कसरत करावी लागत होती.
आणी त्यांची धांदल उडालेली पाहायला मिळाली.
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर रस्त्यांवरती पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे पुणेकर भर पावसात रस्त्यांवरती अडकलेले होते, आणि जागा मिळेल अशा ठिकाणी थांबण्यास पसंती देत होते. संपूर्ण परिसर जलमय झाला होता तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. पुण्यातील कात्रज, वारजे, कर्वे रोड,स्वारगेट,टिळक रोड या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने पुणेकरांना बेजार करून टाकले तर या पावसाने पुणे प्रशासनाचा वाहतुक कोंडीचा भोंगळ कारभारा बरोबरच आता नाले, रस्ते यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची भांडाफोड केली. आजुन दोन दिवस आश्याच पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर येत्या दोन दिवसात पुणे प्रशासनाचे असे किती आजुन निकृष्ट कामाचे चित्र पाहयला मिळेल हे त्या पावसातचं….
Very fast and usefully news