महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १४वा वर्धापन दिन

23

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन कऱण्यात आले आहे. हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन अनेक कारणांनी लक्षवेधी ठरला आहे.

रंशशारदा सभागृहात या कार्यक्रमाला सुरुवात होईल. १२ वर्षापूर्वी राज ठाकरेंनी याच दिवशी शिवतीर्थावर सभा घेऊन नव्या पक्षाची घोषणा केली होती. वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात सकाळी १० वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात राज काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, ‘ठाकरे सरकार’वर वचक ठेवण्यासाठी मनसेचे ‘शॅडो कॅबिनेट’ही आज जाहीर होणार आहे.

मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम अनेक उद्देश डोळ्यापुढे ठेवून नवी मुंबईत ठेवण्यात आला आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद पालिकांची निवडणूक लवकरच होणार असून त्यासाठी मोर्चेबांधणी करण्यासाठी राज ठाकरे आजच्या मेळाव्यात संदेश देण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या निमित्ताने मनसे आणि भाजपचीही जवळीक वाढताना दिसत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांच्या कृष्णकुंजवरील फेऱ्या वाढल्या आहेत. रविवारी शेलार यांनी राज यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. गेल्या २० दिवसांत ते चौथ्यांदा राज यांना भेटले. या पार्श्वभूमीवर राज आजच्या मेळाव्यात भाजपशी मैत्रीबाबत काही संकेत देतात का, यावरही सर्वांच्या नजरा असणार आहेत.