आंबेगाव: आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत मांस वाहतूक करणाऱ्या चार जणांना अटक केली असून तीन चार चाकी वाहने ताब्यात घेतली आहे.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवार दि ११ रोजी पहाटे चारच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरील पिंपळगाव फाटा येथे होंडा सिटी कंपनीची कार एम एच ०२- ६३७३ व होंडा सिटी एम एच १२ -४३०२ ही चार चाकी वाहने पहाटे पेट्रोलिंग दरम्यान भरधाव वेगात दिसल्याने व गाडीच्या मागे बजरंग दलाचे कार्यकर्ते दोन्ही गाड्यांचा पाठलाग करताना आढळले संशयावरून पिंपळगाव फाटा येथे गाड्या थांबवल्या असता, एम एच ०२ -६३७३ या गाडीमध्ये बैल व गाईचे मास असल्याचे आढळले व एम एच १२ -४३०२ या गाडीमध्ये हासमी अब्दुल हाजीम कुरेशी, शकीयान रफिक बागवान( सर्व रा. पुणे) व ड्रायव्हर दाऊद बिलाल कादरी ( रा. संगमनेर जिल्हा अहमदनगर) यांना दोन्ही वाहनांसह ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध डी.एस. जाधव पोलीस कॉन्स्टेबल यांनी फिर्याद दिली आहे.
Vदरम्यान दुसऱ्या घटनेत दोनच्या सुमारास कार फाटा येथे मंचर बेल्हे रस्त्यावर कायम स्वरूपी गस्तीच्या ठिकाणी एक पिकअप गाडी एम एच १६ सीए ६६४ ही बेल्हा रोडच्या बाजूकडून मंचर बाजूकडे भरधाव वेगात चालली असल्याने गाडी थांबून पाहणी केली असता, त्यामध्ये बैल-गायीचे मांस असल्याचे निदर्शनास आले, गाडी ड्रायव्हर अझरुद्दीन शहूवूद्दीन पटेल (वय २४ रा. मुबंई) यास गाडीसह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध एस.वि.गवारी पोलीस कॉन्स्टेबल यांनी तक्रार दाखल केली आहे, पुढील तपास पोलीस करत आसुन. सलग एकाच आठवड्यात मंचर पोलिसांनी मास वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची ही चौथी घटना असून अलिशान गाड्या मास वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.