मुंबई : दादरमधील शिवाजी पार्कचे नाव बदलण्यात आले आहे. शिवाजी पार्कचे नाव आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर पश्चिम या भागात आहे. मुंबई महापालिकेने या पार्कचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना, मनसे आणि भाजप तसेच विविध पक्षांचे विविध कार्यक्रम याच मैदानावर होतात. याशिवाय अनेक शासकीय कार्यक्रमदेखील या मैदानावर घेतले जातात.
मुंबई महापालिकेने १९२५ साली शिवाजी पार्क मैदान जनतेसाठी खुलं केले होते. या मैदानाचे मूळ नाव “माहिम पार्क” असे होते.परंतु आता हे नाव बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.