सांगली जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड

29

सांगली : जिल्ह्याच्या जत तालुक्यात उमदी येथे तिहेरी हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे. या हत्याकांडात आई, वडील व बहिणीचा धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. हा पोटच्या मुलानेच खून केल्याचे समोर येत आहे.

खून झालेल्यापैकी वडील गुरलींगाप्पा आण्णाप्पा अरकेरी (वय ८२), आई नागव्वा गुरलींगाप्पा अरकेरी (वय ७५) बहिण समुद्राबाई शिवलिंगाप्पा बिरादार (वय ६२) ही मृतांची नावे आहेत.
या खून प्रकरणी मुलगा सिदाप्पा गुरलींगाप्पा अरकेरी (वय ५८) यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी उमदीचे साहय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.