मुंबई: कोरोनाचा कहर देश भारात वाढतच चालला आहे. आत्तापर्यंत देशात १०८ रुग्ण सापडले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे जी इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ३३ जणांना करोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी रविवारी फोनवरून १५ मिनिटे चर्चा केली. करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याचे समजते.
यावेळी मोदींनी राज्यातील करोनाची लागण झालेले रुग्ण, संशयित रुग्णांची माहिती घेतली. उद्धव ठाकरे यांनीही राज्य सरकारने करोना रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची पंतप्रधानांना माहिती दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. दुसरीकडे, करोनाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रितपणे ठोस पावले उचलण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘सार्क’ देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये अधोरेखित केली.
मोदींनी राज्यातील करोनाची लागण झालेले रुग्ण, संशयित रुग्णांची माहिती घेतली. उद्धव ठाकरे यांनीही राज्य सरकारने करोना रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची पंतप्रधानांना माहिती दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
पुण्यात जमावबंदी ची शक्यता:
करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही शक्यता वर्तविली असून, संपूर्ण शहरात जमावबंदी लागू करायची की, विशिष्ट भागात याबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत घेतला जाणार आहे.
मुंबईत एकही नवीन रुग्ण नाही
कडक उन्हात करोनाचे विषाणू टिकणार नाहीत, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला असतानाच रविवारच्या उन्हाच्या तडाख्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. राज्यभरात करोनाचे रुग्ण वाढले असले तरी रविवारी मुंबईत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तपासण्यात आलेल्या ४३ रक्ताच्या नमुन्यांमध्ये सर्व निगेटिव्ह आहेत. त्यामुळे मुंबईतील आत्तापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ५ व नवी मुंबई, ठाणे ४ असे एकूण ९ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.