जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची २३ मार्च रोजी होणारी खंडोबाची दरवेळी सोमवती अमावस्येला होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती विश्वस्थानकडून देण्यात आली.
ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. २३ मार्चला सोमवती अमावास्या आली आहे. मात्र सूर्योदयानंतर दुसऱ्या प्रहरात अमावास्येला प्रारंभ होत असल्याने पालखी सोहळा निघणार नाही.
या शिवाय खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळनेही कोरोनामुळे ही यात्रा रद्द करावी, अशी सूचना केली होती. सोमवती यात्रा व पालखी सोहळा आता रद्द करण्यात आला आहे.
पालखी सोहळ्याबाबत विचार विनिमय करण्याबाबत पेशवेवाडा येथे बैठक पार पडली. यावेळी बैठकीत खंडोबादेवाचे मुख्य मानकरी राजाभाऊ पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे, वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी, रमेश राऊत, छबन कुदळे, जालिंदर खोमणे, अमोल शिंदे, दत्ता सकट, किसन कुदळे, अरुण खोमणे, राजाभाऊ खाडे, माणिक पवार, खंडेराव काकडे, माधव बारभाई, काळूराम थोरात उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.