गर्भवती पासून अर्भकाला कोरोना चा धोका संभाव्य

चीन: चीन मध्ये वुहान रुग्णालयात एका नवजात बालकास कोरोणा वयरास चे इन्फेक्शन झाल्याची घटना समोर आली आहे. हा संसर्ग आईच्या पोटातून अर्भकाला संसर्गित होतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. जेव्हा हे बाळ जन्मले होते तेव्हा याचे वजन ३.२ किलो एवढे होते.

या अर्भकाची आई कोरोना बाधित होती. त्यामुळे हा विषाणू आई कडून अर्भकाला संसर्गित झाल्याचे सांगितले जात आहे. या बरोबरच त्या अर्भकाचे पिता देखील संसर्गित होते तसेच त्यांना ताप देखील होता. वुहान रुग्णालयात जेव्हा या महिलेची प्रसूती करण्यात आली तेव्हा या बाळाची चाचणी करण्यात आली. या चाचणीत हे बाळ सकारात्मक आढळले.

परंतु डॉक्टर याची स्पष्टता देऊ शकत नाहीत की, हा संसर्ग जन्मजात त्या बाळाला मिळाला की जन्म झाल्यावर याचा संसर्ग त्या बाळाला झाला. सध्या या अर्भकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. परंतु वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की हा संसर्ग गर्भाशयात झाला असावा.

ही घटना आपल्याला हे दर्शवते की गर्भवती महिलांची याची जास्त काळजी घ्यावयाची आहे. कारण हा संसर्ग आई पासून होणाऱ्या अर्भकाला देखील होण्याची शक्यता आहे. वूहान चिल्ड्रन हॉस्पिटलच्या नवजात औषध विभागाचे मुख्य चिकित्सक झेंग लिंगकोँग यांनी रॉयटर्सला सांगितले की, आई-मुलाकडून कोरोनाव्हायरस संक्रमणाचा संभाव्य मार्ग असल्याचे आपण लक्षात घेतले पाहिजे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा