महाराष्ट्रात साथरोग कायदा लागू : गृहमंत्री देशमुख

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १३ मार्च पासून साथरोग अधिनियम कायदा १८९७ लागू करण्यात आला. असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक रोखण्यासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी व तत्सम अधिकार्‍यांना खालील विशेषाधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
या अधिकार्‍यांनी सांगितलेल्या सरकारी व खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येईल.
याशिवाय केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळांमध्येच कोविड १९ या आजाराचे निदान करणे आवश्यक राहील.
तसेच १४ दिवसाचे घरगुती विलगीकरण किंवा अलगीकरण कक्षातील अलगीकरण हे नियमानुसार आवश्यक असणार आहे. त्यामुळे या सूचना न पाळणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे अधिकार सक्षम अधिकार्‍याला राहतील.
शिवाय कोरोना संदर्भात चुकीची माहिती अथवा अफवा पसरवणार्‍या व्यक्तींविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.त्यामुळे सोशल मीडियावर कोरोना संदर्भात कोणतीही माहिती पाठवताना काळजी घ्यावे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
एखाद्या भौगोलीक क्षेत्रात उद्रेक आढळून आल्यास हे क्षेत्र प्रतिबंधित करणे अथवा उद्रेक नियंत्रणासाठी इतर आवश्यक निर्बंध घालणे इ. अधिकार सक्षम अधिकार्‍याला राहतील.
व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून कोरोनाबद्दल भीती निर्माण होईल असे गैरसमज पसरविणारा मेसेज, पोस्ट पाठविणार्‍यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा