पुण्यातही कोरोनाची अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा

पुणे : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना अफवांचे पीक सोशल मीडियावर उडाले आहे. पुण्यात अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरवण्यात आली होती. आता या प्रकरणी एकाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांची खैर केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.
आपण स्वत: अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तिविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. ही तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. पोलिसांनी अफवा पसरविणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये उतरलेल्या परदेशी पाहुण्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा त्याने सोशल मीडियावरून पसरवली होती. पोलिसांनी यानंतर तपास केला. यामध्ये हा मेसेज खोटा आणि खोडसाळ असल्याचं आढळून आलं. यानंतर पोलिसांनी व्यक्तीला अटक केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा