सावधान…मोबाईलमुळे सुध्दा होऊ शकतो कोरोना!

नवी दिल्ली : कोरोनाने जगभरातील जवळपास १२० देशात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मात्र घाबरुन न जाता काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या हातात दिवसभर असणाऱ्या मोबाईलवरही कोरोनाचा विषाणू बसू शकतो. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे मोबाइल हाताळताना वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोरोना व्हायरस कोठूनही लोकांमध्ये पसरू शकतो. एका अहवालानुसार आपण आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनला वारंवार स्पर्श केल्यास आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी आपले हात नीट धुतले पाहिजे. कारण, आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरुनही,कोरोना व्हायरस आपल्यामध्ये प्रवेश करू शकतो.
कोरोना विषाणू सुमारे १ आठवड्यापर्यंत निर्जीव पृष्ठभागावर जगू शकतात. तसेच, ते कफ किंवा शिंकाच्या स्वरूपात मानवी शरीरातून बाहेर येते. विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका म्हणजे संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधणे.
याबाबत फोर्टिस रूग्णालयाचे डॉ. रविशंकर झा म्हणाले की, आपला स्मार्टफोन ९० मिनीटानंतर सॅनिटायजरने स्वच्छ केला पाहिजे. तुम्ही जर सतत फोन वापरत असाल तो हात आपल्या चेहऱ्याला लावण्याची आवश्यकता नाही.
याबाबत सन २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, आपला स्मार्टफोन टॉयलेट सीटपेक्षा तीन पट जास्त बॅक्टेरिया आपल्या फोनवर असतो. वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार मोबाईल ठेवल्यामुळे किंवा पकडल्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस मोबाइल फोनमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. याबाबत “इन्शुरन्स गो” या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार ६ महिन्यात २० पैकी एक व्यक्ती आपला मोबाईल साफ करणे गरजेचे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा