पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय शासन आदेशाप्रमाणे घेण्यात येत आहे.
त्यासाठी कार्यालयीन स्तरावरील प्रतिबंधात्मक उपायांसोबतच दक्षता म्हणून कार्यालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे परिपत्रक आज झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाने जारी केले.
झोपडपटटीधारकांच्या पात्र- अपात्रतेच्या यादीबाबत असणाऱ्या तक्रांरीवर होणाऱ्या सुनावण्या पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत तसेच झोपडपटटयांचे प्राथमिक सर्वेक्षण व सदनिका लॉटरीबाबतचे कामकाज पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याच्या सूचना अपिल शाखा व सर्व सक्षम प्राधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.