सध्या राजकारणात भाजप चा प्रतिस्पर्धी नमला आहे.तर विधानसभा रिंगणात एव्हढे प्रतिस्पर्धी नमले तरी एक योद्धा, एक तरुण, एक साहेब म्हणजेच ८० वर्षांचा वाघ शरद पवार यांनी रिंगण सोडले नाही.तर रिंगणात झुंज देण्यासाठी हा ८० वर्षांचा योद्धा तयारी करताना दिसतोय.वयाच्या ८०व्या वर्षी पवार हे मैदानात दोन दोन हात करण्यासाठी उतरले आहेत एव्हढंच काय तर एका दिवसात दोन जिल्ह्याचे दौरे देखील करत आहेत. त्यामुळे निकाल काहीही असो पण विधानसभेच्या रिंगणात हा योद्धा मात्र रणशिंग फुंकतना दिसतोय.
शरद गोविंदराव पवार डिसेंबर १२ १९४० -हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०,१९८८,१९९१ व १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.१९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे राजकारणातील खोलवर रुजलेलं मुळ आहे. पक्षातील सरदार सोडून गेले तरी हा सेनापती अंगातील तोच चिवटपणा घेऊन मैदानात ठाम उरला आहे. एकेकाळी महाराष्ट्रातील तमाम मोठ्या तरुण पिढींवर पवारांचे अधिराज्य होते. एक सामान्य ठिकाणी मोलमजुरी करणार्या व्यक्तीला त्यांनी गृहमंत्री केला.एवढेच काय तर सरकार आसताना अनेक नवनवीन धोरणे राबविली.पवारांनी राजकारण, आणि समाजकारण हे नेहमीच वेगवेगळे ठेवले.किल्लारीचे (लातुर)भुकंप असो वा गुजरातचे हा गडी तिथे रात्रंन दिवस राबला हे ही तितकेच खरे म्हणूनच काय विरोधी पक्षनेत्यांपासून ते सत्तेत आसलेल्या अटल वाजपेयींना देखील त्यांचे कौतुक करण्या पासून राहवलं नाही.हे मुळ इतके चिवट आहे कि मोदी आणि शहा यांना यांच्या शिवाय दुसरे टीका करायला उरलेच नाही की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. २००९,२०१४,२०१९ या राजकारणात ही मोदींनी शरद पवारांनाच निशाण्यावर धरले होते.महाराष्ट्रात जर भाजप सेनेला सत्ता प्रस्थापित करायचे असेल तर हे जे शरद पवार नावाचे खोड हे कुठेतरी खुरपटले पाहिजे हे मोदींना कळुन चुकले आहे म्हणूनच मोदी यांनी या खोडाला महाराष्ट्रातून उपटून टाकण्यासाठी तो धक्का लावला आहे. पण पवारांशिवाय महाराष्ट्रातील राजकारण हे अपुर्णच अवघ्या महाराष्ट्राला माहिती असलेली गोष्ट आहे.कितीही संकटं आले तरी हा ८० वर्षांचा रांगडा गडी एकटा निघाला..