पुण्यात सापडले तीन नवीन रुग्ण

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक राज्य जिथे लॉक डाऊन करण्यात आली तिथे मुंबईतून एक आनंदवार्ता समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधित असलेले १२ रूग्ण बरे झाले आहेत. लवकरच या रूग्णांना डिस्चार्ज मिळणार आहे. या बातमीने सगळ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे राज्यात आज पुन्हा चार नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. पुण्यात तीन तर साताऱ्यात एक करोना रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १०१वर पोहोचली आहे. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.

देशात ५०० पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत तर महाराष्ट्रात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. जगभरात या विषाणूमुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत. आज पुण्यात करोना व्हायरसचे आणखी तीन नवीन रुग्ण आढळले आहेत.

दोघे खासगी हाॅस्पिटलमध्ये तर एकाला महापालिकेच्या डाॅ. नायडू हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. डाॅ. नायडू हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असलेला तरूण हा परदेशातून आला असून इतर दोघांना परदेशात गेल्याची हिस्ट्री नाही. त्यामुळे ते कोणाच्या संपर्कात आले याची माहिती महापालिका प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

पुण्यात जमाव बंदी करण्यात आली आहे. सर्व सर्वजणी स्थळे बंद करण्यात आली असून पोलिसांची गस्त चालू आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. व्यावसायिक आस्थापने, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदामे आदींसह सर्व दुकानांचे व्यवहार बंद आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा