श्री.क्षेत्र तुळापूर, अभिवादन करून समाधी स्थळ बंद

कोरेगाव भिमा-लोणीकंद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३२ वी पुण्यतिथी दिनानिमित्त आज( दि.२४ मार्च ) रोजी वढु बुद्रुक व शौर्यापिठ श्री क्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शंभूराजांना मानवंदना देण्यात आली व मानवंदना देण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह विविध राज्यातुन अलोट गर्दी जमते.

यात नाशिक, श्रीगोंदा व पुण्यातुन मोठ्या प्रमाणात शक्तिज्योतींचे आगमन होत असते. समाधीवर व पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरव्दारे होणारी पुष्पवृष्टी व पोलीस दलामार्फत देण्यात येणारी शासकीय मानवंदना सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शंभूभक्त उपस्थित असतात. मात्र राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील विविध मंदिरे बंद ,तसेच यात्रा,उत्सव, उरूस, यांसारखे कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले आहे .

त्या आवाहनाला प्रतिसाद देतवढू बुद्रुक व तुळापूर येथील कार्यक्रम तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळाचे दर्शनही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन,ग्रामस्थ, उत्सव समिती यांच्या वतीने घेण्यात आला आहे. व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सदर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत , धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे व छ. संभाजी महाराज यांची आज (दि. २४ मार्च ) रोजी पुण्यतिथी ग्रामपंचायत पदाधिकारी व सरपंच रुपेश शिवले, उपसरपंच राहुल राऊत, मा. सरपंच गणेश पुजारी, मा. उपसरपंच अमोल शिवले, ग्रामपंचायत सदस्य संजय चव्हाण,संतोष शिवले, नवनाथ शिवले, यांच्या नेतृत्वाखाली विधीवत पूजा व अभिषेक करुन संपन्न झाला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा