सामान्य मजूर, छोटा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

नवी दिल्ली: कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहेत. लोकांना असुविधा होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करत आहे. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होईल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. अश्यातच आणखी एक बातमी समोर आली आहे. सामान्य मजूर, छोटा शेतकरी, असंघटित कामगारांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनामुळे व्यवसाय थंड झाल्याने मजूर आणि कामगारांवर संकट कोसळलंय. यासाठी केंद्रातर्फे मोठे निर्णय घेण्यात येत असून मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचं समजतंय.

याला लागून आणखी एक निर्णय घेतला आहे देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.

सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार याबाबत आणखी माहिती अशी आहे की यासाठी दीड लाख कोटींचं पॅकेज घोषित करणार असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने तूर्त या निर्णयाची अंतिम घोषण केलेली नाही. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा