पुणे: जगात करोनाचा फैलाव वेगानं होत असून अनेक देशांमध्ये हाहाकार माजला आहे. अशातच भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. परंतू, सरकारनं वेळीच पावलं उचलल्याने त्याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अवघा देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. घराच्या दारात लक्ष्मण रेषा ओढून ठेवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलं आहे.
अश्या परिस्थितीत नागरिक जीवनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडत आहेत. यादरम्यान नागरिकांना संसर्ग होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. याची दखल घेत प्रभाग क्रमांक २५ वानवडी येथील नगरसेवक प्रशांत जगताप यांनी महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांचा सहाय्याने औषध फवारणी करण्यात आली आहे.
संपूर्ण देशातील कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रभागातील एस आर पी एफ ग्रुप नंबर २ वानवडी येथील २४२ कॉटर्स ४८ कॉटर्स, १२० लाईन, फ्लॉवर लाईन, मोटार परिवहन विभाग, सर्व शासकीय कार्यालय परिसरात स्थानिक नगरसेवक प्रशांत जगताप यांनी स्वतः उभे राहून पुणे महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांकडून जंतुनाशक औषध फवारणी करून घेतली व पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने औषध फवारणी करण्यात येणार आहे.