भररस्त्यात तरुणीची पॅन्ट उतरविली

पिंपरी: दमदाटी केल्याबाबतचा जाब विचारणाऱ्या तरूणीला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. नराधम आरोपी एवढ्यावरच नाही थांबले तर त्यांनी त्या तरूणीची भररस्त्यात पॅन्ट उतरविली. हा धक्कादायक प्रकार दि.१६ रोजी थेरगाव येथे घडला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

होनाजी किसन घोगरे (वय ४६), जनाबाई होनाजी घोगरे (वय ३६), प्रथमेश होनाजी घोगरे (वय १८), आरती कानिफनाथ घोगरे (वय ४४), कानिफनाथ घोगरे (सर्व रा. समर्थ कॉलनी, पवारनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २२ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रात्री साडेआठ वाजता फिर्यादी त्यांच्या घरासमोर बॅडमिंटन खेळण्यासाठी आल्या असता होनाजी घोगरे याने फिर्यादीस “तु घरात जा नाहीतर तुझ्या कानाखाली मारेल’ अशी दमदाटी केली. व पुढील तपास थेरगाव पोलीस स्टेशन करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा