कष्टकरी वर्गातील मुलांना खाऊ वाटप

पुणे : संपूर्ण महाराष्ट्र लोकडाऊनमध्ये असताना पुणे शहरातील अनेक गरीब कष्टकरी वर्गाला आज घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक लोकांचा उदरनिर्वानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे लक्षात घेता “होरिझोन असोसिएशन फॉर लिट्रसी उपलिफ्टमेंट” या संस्थेकडून अन्नधान्यचा स्वरूपात तसेच फूड पॅकेट चा स्वरूपात मदत करणे सुरू आहे.
आज एक नवा उपक्रम या संस्थेकडून करण्यात आला.

गुलटेकडी, शेरखान चाळ , काशेवाडी, येथील कष्टकरी वर्गातील लोकांचा लहान मुलांना बिस्किटे , कुरकुरे व केकचे पॅकेट वाटण्यात आले . त्यावेळी मुलांनाचा चेहऱ्यावरचा आंनद अगदी पाहण्यासारखा होता .आज शहरामध्ये कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने सगळेच बंद आहे. यावेळी सोशल डीस्टटसिंगची काळजी घेत मुलांनी खाऊ वाटप करण्यात आली. दि. २५ मार्च पासून शहरातील विविध ठिकाणी अन्नधान्य व फूड पॅकेट चे वाटप सुरू आहेत.

आंबेडकर नगर ,गुलटेकडी , शेरखान चाळ ( कोंढवा बुद्रुक ) कात्रज , दापोडी , पिंपरी तपकिर चौक येथील लोकांना यशस्वीरित्या अन्नधान्यचे वाटप करण्यात आले आहे. यात तांदूळ , डाळ , गव्हाचे पीठ , हळद ,मीठ, तेल , साखर , चहा पावडर, पोहे इ. पदार्थांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे जे लोक गरीब आहेत तसेच बांधकाम क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांचापर्यंत मदत पोहोचवली जात आहे. जे लोक बेघर आहेत. तसेच मजूर कामगारांचा कुटुंबातील लोकांना रोज फूड पॅकेट देऊन मदत केली जात आहे.
यामध्ये दीप्ती जाधव ( सोशल ऍक्टिव्हिस्ट ) ऍड. जहीद शेख ( चेअरमन ऑफ होरिझोन असोसिएशन फॉर लिट्रसी उपलिफ्टमेंट ) आणि त्यांचा साथीदाराकडून ह्या कामात पुढाकार घेऊन हे काम केले जात आहे.
यावेळी दीप्ती जाधव यांनी पुणे पोलीसांचे आभार मानले.

 

                                                                                            – ज्ञानेश्वरी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा