एटीम रूम मध्ये सॅनिटाईझर ठेवावे: जि. प. सदस्य शरद नवले

11

श्रीरामपुर: सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असलेला दिसत आहे. देशातील सर्वच यंत्रणा या विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, त्या विषयी खबरदारी चा उपाय म्हणून संपूर्ण देशभरात लॉक डाऊन केलेले आहेत. या लॉक डाऊन मुळे जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे. किराणा मालाचे दुकान,भाजीपाला, तसेच बँका व बँकांचे एटीम देखील लॉक डाऊन मधून वगळले आहेत.

या सर्व जीवनावश्यक नागरिक आर्थिक व्यवहार करण्यासाठी एटीम चा वापर मोठ्या प्रमाणावर करताना पहावयास मिळत आहेत, असे नवले म्हणाले परंतु त्या एटीम रूम मध्ये संबधित बँकांनी कोणतेही खबरदारी चे उपाय योजना केलेली दिसत नाही कारण अनेक नागरिक दिवसभरात त्या एटीम मशीन चा वापर करत आहेत आणि त्या मशीन ला सूचना देण्या साठी किव्हा आपला व्यवहार पूर्ण करण्यासाठी एटीम मशीन ला वारंवार हात लावावा लागतो. अश्या प्रकारे अनेक ग्राहक त्या मशीन चा वापर करीत आहेत आणि त्या ठिकाणी सॅनिटाईझर नसल्याने अनेक लोक हात सॅनिटाईझ न करता च मशीन चा वापर करीत आहेत.

या मुळे कोरोना चा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही यातून एखादी व्यक्ती कोरोनाचा संक्रमणा खाली असेल तर त्या व्यक्ती ने मशीन चा वापर केला तर त्याचा प्रादुर्भाव इतर सामान्य नागरिकांना होण्याची शक्यता आहे. म्हणून संबंधित बँकांच्या एटीम मशीन जवळ सॅनिटाईझर ची व्यवस्था त्या बँकेच्या माध्यमातून केली जावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केली आहे. या मागणी चा विचार सर्वच खाजगी व सरकारी बँकांनी लवकरात लवकर करावा आणि प्रत्येक एटीम मशीन रूम मध्ये सॅनिटाईझर ची व्यवस्था करावी आणि कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे असेही नवले म्हणाले.

                                                                                            – दताञय पोपटराव खेमनर