पुणे: पुणे येथील सिंहगड रोडवर लॉक डाऊनच्या काळात रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आणि फिरण्यासाठी निघालेल्या नागरिकांना पोलिसांनी व्यायामाची शिक्षा देण्यात आली.
सध्या पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात दिवस संपूर्ण शहर सील केले असताना नागरिक कोणतेही गांभीर्य न बाळगता बाहेर फिरत आहेत. त्याचाच परिणाम आज सिंहगड रोडवर फिरणाऱ्या उत्साही नागरिकांना पोलिसांनी व्यायामाची शिक्षा दिली.