‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’ च्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना फळवाटप

पुणे, २४ एप्रिल २०२०: करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. मात्र यामुळे रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचे हाल होत आहेत. अगदी वेळप्रसंगी आपल्या डब्यातील जेवण सुद्धा पोलीस गरिबांना वाटून टाकत आहे. अशा परिस्थिती काही संस्था आणि अन्नदाते पुढे येत आहेत. माणुसकी जपत त्यांनी केलेली ही मदत खरंच लाखमोलाची ठरतेय.

आता या मदत ‘कार्यास आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’ चा देखील हातभार लागला आहे. पोलीस यंत्रणा समाजासाठी करत असलेल्या या धाडसी कामासाठी रात्रंदिवस एक करत आहेत. या त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् तर्फे पुणे शहरातील सर्व भागात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फळ वाटप करण्यात आले.

केवळ पोलीस कर्मचाऱ्यांना नव्हे तर रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील फळांचे वाटप करण्यात आले. तब्बल ५०० किलो फळे पूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाटण्यात आले. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् ने केलेले हे कार्य माणुसकीची जाणीव करून देणारे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा