औरंगाबादमध्ये २४ तासात सात नवीन रुग्ण

कोरोना विषाणूचे सावट महाराष्ट्रावर पसरले आहे. या कारणास्तव सर्वत्र लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. संकट केवळ कोरोना विषाणू पुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर आता आर्थिक संकट देखील तीव्रतेने राज्यावर ओढवणार आहे. सर्व प्रकारचे उद्योग धंदे आणि सरकारी दळणवळण यंत्रणा बंद असल्याने राज्य सरकारला महसूल मिळणे जवळपास बंद झाले आहे.

ओढवलेल्या आर्थिक संकटात केंद्र सरकारने मात्र मोठमोठ्या उद्योजकांकडून आणि कंपन्यांकडून येणाऱ्या देणगीचे मार्ग बंद केले आहे. त्यामुळे हे आर्थिक संकट आता आणखीनच तीव्रतेने जाणवू लागले आहे. अशा वेळेस महाराष्ट्र सरकारला आपल्या सहकार्याची तीव्र गरज आहे. राज्यातील प्रत्येक गरीब बांधवाला तुमच्या मदतीची आस लागून आहे.

माणुसकीला जपत या सर्व अडचणीत असलेल्या नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आपण उस्फू्र्तपणे समोर यावे असे आव्हान व विनंती ‘न्यूज अनकट’ आपल्याला करत आहे. अगदी एक रुपया सुद्धा आपण जमा करू शकता. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी मदत आपण करूया. मदत कमी असली तरी चालेल पण तो एक रुपया सध्या लाख मोलाचा ठरू शकतो.

आमच्या “न्यूज अनकट” च्या प्रतिनिधींनी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये पैसे जमा केले आहेत आमच्या या मोहिमेला प्रतिसाद देत आपणही मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये शक्य होईल तेवढा निधी जमा करा. तुम्ही जमा केलेल्या निधीचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा तो आम्ही आमच्या पोर्टलवर आणि फेसबुक पेज तुमच्या नावासह प्रसिद्ध करू. तुम्ही केलेल्या या देणगीतून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि ही मोहीम मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल. या मोहिमेला मिळालेला आपला प्रतिसाद हा एका अर्थाने माणुसकीला मिळालेला प्रतिसाद असेल….