अंकिता पाटील यांनी सरकारचे मानले आभार

इंदापूर, दि.२६ एप्रिल २०२०: देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पुणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील काही भागातील विद्यार्थी राजस्थान येथील कोटा येथे अडकलेले होते हे विद्यार्थी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्याशी फोनवरून संवाद करत होते व महाराष्ट्र येण्याबाबत त्यांच्या (राजस्थान) सध्याच्या संस्थांकडे असलेल्या अपुरी संसाधने, राहण्याची सोय, राज्यातील काही भागात अडकलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींची सुरक्षा, वैद्यकीय सुविधांमधील तरुण डॉक्टरांची सुरक्षा आदी विषयांवर चर्चा करत होते.

या अडकून राहिलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्याची व्यवस्था राज्य शासनाने करावी अशी मागणी नवी दिल्ली येथील ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन (इस्मा) च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा व पुणे जि.प.सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली होती.

या अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात जि.प.सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत राजस्थानच्या सरकार सोबत दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे पावले टाकण्यास युद्धपातळीवर सुरुवात केली. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचे अंकिता पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना सीईटी, एनईईटी, नागरी सेवा परीक्षांसारख्या प्रवेश परीक्षांवर स्पष्टीकरण आवश्यक आहे. आमचे पदवीधर युवक युवती नोकरी गमावत आहेत. मी या आपत्कालीन परिस्थितीनुसार या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे तसेच सरकार, सरकारी अधिकारी आवश्यक कारवाई करत आहेत, या सर्व विद्यार्थीना विनंती आहे की आपण कृपया घाबरून जाऊ नये आपण आहात तिथेच थांबा सुरक्षित रहा काळजी घ्या असे आव्हान जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केली आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा