परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणणार

नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२०: लॉकडाऊनमुळे इतर देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या योजनेबाबत परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच सादरीकरण केले. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी बोलावलेल्या उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे सादरीकरण सादर करण्यात आले.

परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी भारतीय नागरिकांच्या स्वदेशी परतण्याबाबत मंत्रालय करत असलेल्या एक्झिट योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. कुठल्या देशामधे किती लोक अडकले आहेत आणि त्यांना भारतात आणण्यासाठी किती उड्डाणे आवश्यक आहेत, याचा आढावा घेतला जात आहे. याचबरोबर परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी जेवढे शक्य होईल तेवढे कोरोना चाचणीचे नकारात्मक असल्याचे पत्र सोबत घेऊन यावे याचा प्रयत्न केला जाईल.

हर्ष श्रृंगला म्हणाले की, हे केल्यामुळे कोणाला क्वारंटाईन शिबिरामध्ये पाठविणे आवश्यक आहे आणि कोणाला होम क्वारेन्टाईन मध्ये पाठवावे हे ओळखण्यास मदत होईल. परराष्ट्र मंत्रालय या योजनेच्या सविस्तर तपशिलावर काम करीत आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होईपर्यंत प्रथम कोणाला तातडीने घरी परत आणणे आवश्यक आहे आणि ते कितपत योग्य आहे याची पडताळणी केली जाईल.

कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे इतर देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांपर्यंत अशी यादी मर्यादित राहणार नाही. या यादीमध्ये अशा भारतीयांचा देखील समावेश असेल ज्यांना ठोस ‘मानवतावादी कारणास्तव’ मायदेशी परत यायचे आहे. यासाठी भारतातील विविध राज्यांमधील विमानतळांवरून विशेष उड्डाणे घेण्याचे नियोजन आहे. यामुळे परदेशातून येणार्‍या प्रवाशांना क्वारंटाईन मध्ये पाठविणे विविध राज्य सरकारांना सोयीचे होईल. परदेशातून भारतीय नागरिकांना आणण्यासाठी केवळ फ्लाइट्सच नव्हे तर नौदलची जहाजेही शक्य असेल तेथे वापरली जातील.

केंद्राकडून हा आराखडा मंजूर होताच या योजनेची अंमलबजावणी केली जाईल अशी सूचना राज्यांना देण्यात आली आहे. यापूर्वीही भारतीय नागरिकांना इतर देशातून परत आणण्याची योजना मंत्रालयाने राबविली होती.
केरळ, पंजाब, गोवा, राजस्थान, तेलंगणा आणि तमिळनाडू अशा काही राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक परदेशात वास्तव्य करतात. अशा भारतीय नागरिकांच्या परतीच्या योजनेवर लवकरात लवकर काम सुरू केले पाहिजे, असे या राज्यांचे म्हणणे आहे. यासाठी त्या सर्व प्रोटोकॉलचे अनुसरण केले पाहिजे जेणेकरुन भारतीय नागरिकांचा देशातील प्रवेश सुरक्षित होईल. तसेच, क्वारंटाईन मध्ये ठेवणे आणि होम क्वारंटाईन यांचे गंभीरपणे पालन करावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा