मुंबई, २७ एप्रिल २०२०: देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्र राज्य सर्वाधिक त्रस्त आहे. राज्यात कोरोनाची ७ हजाराहून अधिक प्रकरणे आहेत. या संसर्गामुळे आतापर्यंत प्रांतात ३२३ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाची ५०४९ प्रकरणे आहेत, त्यापैकी १९१ लोकांनी आपला जीव गमावला आहे.
मुंबईत कोरोनाची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, शहरातील सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांपैकी एक असलेल्या नेस्को केंद्राचे मोठ्या क्वारंन्टीन सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, जिथे कोरोना रूग्ण ठेवण्यात येतील. प्रदर्शन केंद्रात ५ मोठे हॉल आहेत. त्यामध्ये एकूण १२४० बेड असतील.
मेच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रूग्णांना नेस्को प्रदर्शन केंद्रात ठेवले जाईल. या केंद्रामध्ये २०० शौचालये आहेत, परंतु नंतर अधिक उपलब्ध करून देण्यात येतील. आतापर्यंत या केंद्रामध्ये क्वारंन्टीन ठेवण्यासाठी ३०० बेड तयार करण्यात आले आहेत. पुढच्या आठवड्यात उर्वरित बेडची व्यवस्था केली जाईल. ही मुंबईतील सर्वात मोठी क्वारंन्टीन सुविधा आहे. येथे हेल्पडेस्क, स्वच्छता, चौकशी, वैद्यकीय तपासणी व इतर अनेक स्टॉल्स बांधण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे