तांदूळवाडी मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उस्मानाबाद, दि. २८ एप्रिल २०२० :
संपूर्ण देशभरात १ महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले लॉकडाउन चालू आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन तसेच जनता हे एकजूट होऊन लढा देत आहेत. संचारबंदी असल्या कारणाने उद्योगधंदे बंद आहेत. जीवनावश्यक गोष्टींची दुकाने सोडून बाकी सर्व बंद आहे. तरी या काळात नागरीकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्या लोकांचे रोजच्या मजूरी वरच पोट भागायचे त्यांची परिस्थिती बिकट आहे. तरी या सर्वांना, लोक स्वतःहून मदत करत आहेत.

मौजे तांदूळवाडी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथील सरपंच सौ. दिपाली नितीन काळे व उपसरपंच रविंद्र नानासाहेब काळे यांनी परिस्थिती लक्षात घेता गावातील गरजू नागरिकांना जीवनावश्यक गोष्टीचे वाटप करून मदत केली. यामुळे मौजे तांदूळवाडी येथील नागरीकांना चांगला दिलासा मिळालेला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती करड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा