रिक्षावाले काकांच्या मदतीला सामाजिक संस्था

पुणे, २९ एप्रिल २०२०: सर्वत्र लॉकडाऊन आहे त्यामुळे सर्व वाहतूक व दळणवळण व्यवस्था बंद आहे. पुणे म्हटलं की वाहतूक व्यवस्थेमधला कणा हा रिक्षावाला मानला जातो, परंतु या लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने रिक्षावाल्यांचा रोजगार बंद झाला आहे. रोज भयानक ट्रॅफिकच्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढणारा हा रिक्षावाला आज स्वतःच अडचणीत सापडलेला आहे.

सरकार मजूर, गरीब यांच्यासाठी वेगवेगळे योजना काढून अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचे वाटप करत आहे, परंतु दैनंदिन रोजगारावर अवलंबून असलेला रिक्षावाला मात्र यामध्ये दुर्लक्षित झाला आहे. याच दुर्लक्षित रिक्षावाल्यांकडे लक्ष वेधून घेण्याचे काम पुण्यातील ‘युवा स्पंदन’ व ‘सोशल मोदक’ या संस्थांनी केले आहे.

युवा स्पंदन व सोशल मोदक यांच्या माध्यमातून “आपला रिक्षावाला” हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पुण्यातील १०० रिक्षाचालकांच्या खात्यात प्रत्येकी १००० रुपये देण्यात येणार आहेत. हा उपक्रम राबवत असताना काही रिक्षावाल्यांनी स्वाभीमानाने मदत नाकारली व सांगितले की, समाजात आमच्या पेक्षाही अनेक गरजू व गरीब बांधव आहेत ज्यांना याची जास्त गरज आहे. त्यांचा हा मोठेपणा कौतुकास्पद आहे. तरीही या योजनेअंतर्गत पुण्यातील दानशूर व समाजसेवकांनी प्रकर्षाने पुढे येऊन शक्य होईल तेवढी मदत या रिक्षावाल्यांसाठी करावी अशी विनंती व आव्हान युवा स्पंदन व सोशल मोदक यांच्या मर्फे करण्यात आले आहे.

बँकेचा तपशील:

युवा स्पंदन ( yuva spandhan)

बँक: डीजीबँक- डीबीएस

खाते क्रमांक: ८८१०२८३७९०९६

आयएफसी कोड: DBSS0IN0811

तसेच खालील क्रमांकांवर फोन पे, गुगल पे, पेटीएम द्वारे मदत करू शकता
चेतन धोत्रे : ९८८१२८८५५८
प्रशांत पाटील: ९६३७४८०७५७

अधिक माहितीसाठी संपर्क :
करण सुरवसे: ९०२८९८५०८५

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा