पंढरपुर,२९ एप्रिल २०२० : देशात व राज्यात सध्या कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव चालू आहे, याला प्रतिबंध करणेसाठी सर्व ठिकाणी नाकाबंदी लावण्यातआली आहे त्याठिकाणी व इतर जागी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा नागरिकांशी संबंध येत आहे त्या अनुषंगाने त्यांच्या मूलभूत तपासण्या करणे गरजेचे आहे, त्यानुसार ज्यांचे वय 50 वर्षे पेक्ष्या जास्त आहे अशांच्या चाचण्या मा. डॉ सागर कवडे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सूचनेनुसार ,वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशन संचलित,चॅरिटेबल,जनकल्याण हॉस्पिटल मध्ये मोफत करण्याचे नियोजन केले आहे. आज सकाळी १० वाजलेपासून ४० जणांची ,थर्मल स्कॅनर ने टेम्प्रेचर तपासणी,मूलभूत रक्त तपासणी,ईसीजी,छातीचा फोटो व इतर तपासण्या करण्यात आल्या . यासाठी डॉ आनंद कुलकर्णी,डॉ सौ जयश्री शिनगारे,डॉ महेश लिंगे हे सर्वांना तपासून मार्गदर्शन करीत आहेत यामध्ये रेडिओलॉजिस्ट डॉ रायभान यांचे सहकार्य लाभत आहे।तसेच नर्सिंग स्टाफ,लॅब टेक्निशियन व इतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत, या ठिकाणी मा. प्रांत आधिकारी ढोले साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे साहेब यांनी भेट देवून आवश्यक सूचना दिल्या, मा. कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनखाली चालू असलेल्या या जनकल्याण हॉस्पिटल मधून गेली १२ वर्षेपासून रुग्णांची सेवा केली जात आहे, कोणत्याही राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सहभागी होऊन रुग्ण हाच परमेश्वर समजून सेवा देणे चालू आहे, मा डॉ सागर कवडे साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व तपासण्या करणार असल्याचे प्रतिपादन ,वसंतदादा काळे मेडिकल फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधीर शिनगारे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी