टाटाने केली आपली ऑनलाइन शॉपिंग साईट सुरू

पुणे, दि.३० एप्रिल २०२० : भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे दुकानांसह ऑनलाइन शॉपिंगही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अमेझॉन, फ्लिपकार्ड आणि अन्य विदेशी साइटस् ही बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका सर्वांनाच बसला असल्याचे पहायला मिळत आहे.

परंतु आता याला पर्याय म्हणून टाटा ग्रुपकडून नागरिकांसाठी एक ऑनलाइन शॉपिंग सुरू करण्यात आली आहे. www.tatacliq.com या संकेतस्थळावर जाऊन क्लिक केल्याने आपल्याला ऑनलाइन शॉपिंग करता येणार आहे. हे शॉपिंग मॉल पूर्णपणे भारतीय पद्धतीने तयार करण्यात आले असून, भारतातील एका महान व्यक्तीने ही साईड तयार केली आहे. त्यांचे नाव रतन टाटा . रतन टाटा यांचे भारताच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट आले आहे. त्यावेळी टाटा हे देशाच्या मदतीसाठी उभे राहिले आहे.

आता सध्या कोरोनाच्या संकटातही त्यांनी सरकारला १५०० कोटींची मदत केली आहे. त्यामुळे त्यांचे मोठं योगदान प्रत्येक वेळी देत असतात. आता टाटाने ऑनलाइन शॉपिंगमध्येही आपलं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे या साईट वरून प्रत्येक भारतीयाने आपली शॉपिंग करावी, आणि आपल्या भारतीय व्यक्तीला सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

आज मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या ऑनलाइन शॉपिंग साईट सुरू आहेत. त्यात टाटाने टाकलेले हे पाऊल अभिनंदनीय आणि आदर्शवत असे आहे. एक भारतीय व्यक्तीने भारतीयांसाठी बनवलेली ही ऑनलाइन शॉपिंग साईटवरून शॉपिंग केली तर आपल्याच भारतीयाला त्याचा फायदा होऊन, भारतीयांचा विकास होण्यास मदत होईल. त्यामुळे चीन आणि अन्य देशांच्या असणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग साईट न वापरता या साइटवरून शॉपिंग केली तर आपल्याला फायदाच होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा