केंद्राचा राज्य सरकारांशी भेदभाव

पंजाब, १ मे २०२०: कोरोना विषाणूच्या साथीच्या विरोधात देशातील प्रत्येक भागात युद्ध चालू आहे. या युद्धादरम्यान, गैर-भाजपा शासित राज्यांनी केंद्र सरकार त्यांच्याविरोधात भेदभाव करीत असल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारचा निषेध करत पंजाबमधील काँग्रेस पक्षाने सर्व लोकांना घरांच्या छतावर तिरंगा फडकावा असे आवाहन केले आहे. १ मे रोजी काँग्रेसने इथल्या प्रत्येकाला केंद्राला विरोध दर्शवावा असे आवाहन केले आहे. केंद्र सरकार पंजाब आणि अन्य बिगर भाजप शासित राज्यांसह भेदभाव पूर्वक वागणूक दिली जात असल्याचा आरोप पंजाब काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

सर्व आमदारांनी या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याशी भेट घेतली, ज्यात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड़ यांनी हा प्रस्ताव मांडला. कॅप्टन अमरिंदर यांच्या संमतीने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे राज्यात दरमहा ३३६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊन व कर्फ्यू संपला की पंजाबला या आर्थिक वर्षात सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा तोटा होईल असा अंदाज आहे.

असे असूनही पंजाब मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, राज्यासाठी आत्तापर्यंत केंद्राकडून कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही. यासह पंजाब काँग्रेसने तिरंगा फडकावून शेतकर्‍यांसाठी आणि कोरोना विषाणूविरूद्ध लढणाऱ्या आघाडीच्या कामगारांशी ही मोहिम जोडली आहे. केवळ पंजाबच नव्हे तर काँग्रेस शासित इतरही अनेक राज्यांनी दावा केला आहे की त्यांना केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, महाराष्ट्र या राज्यांचे हि असे म्हणणे आहे की केंद्र सरकारच्या मदतीशिवाय ही लढाई लढणे कठीण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा