पुण्यात अवकाळी पावसाची झोड….

15

पुणे, १ मे २०२०: पुण्यात दुपारच्या सुमारास अवकाळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या वाऱ्यामध्ये काही ठिकाणी नुकसान झाल्याचे पहायला मिळाले.

वाऱ्यामुळे संचेती चौकातील भुयारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कामान कोसळली. लॉक डाउन असल्यामुळे रहदारी पूर्ण बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही.

तसेच दुसरी घटना सोमवार पेठेतील सदा आनंदनगर परिसरात घडली आहे. एका इमारतीवर असणारा एका कंपनीचा टॉवर भर पावसात कोसळल्याने त्या परिसरात रेंज जाण्याचा प्रकार समोर येणार आहे.

याशिवाय शनिवारवाड्याजवळ असणारे जुने झाड या पावसाने रस्त्यावर कोसळले. त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी