पुणे, दि. २ मे २०२० : टाळेबंदीत अडकले असताना कोटा येथील विद्यार्थ्यांपैकी काहींनी व्हिडिओ, मॅसेजद्वारे मदत करण्याची अपेक्षा राज्य सरकारकडे व्यक्त केली होती. याची दखल घेत दोन्ही राज्यांच्या समन्वयाने ही प्रक्रिया पार पडली व आज हे विध्यार्थी पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कोटा (राजस्थान) येथून विद्यार्थी एसटीने स्वारगेट बसस्थानक पुणे येथे आज पहाटे १२:३० वाजता (शेवटची चौथी बस) पोहोचली. ७४ विद्यार्थी आणि ८ ड्रायव्हर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोना ची लक्षणे अथवा आजारी असलेले यात कोणीही आढळले नाहीत.
राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी कोटा येथे जातात. करोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी करावे लागलेले लॉकडाउन या विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणीत टाकणारे ठरले होते. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी त्यातील काहीजण आपापल्या घरी परतले. मात्र, अनेक जण तिथेच अडकले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी