पुरंदर, दि.२ मे २०२०: कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यातील शाळांना कुलूप लागले आहे. आणि जणू काही सुट्ट्या सुरू झाल्याचा आभास निर्माण झाला. मे महिन्यात विद्यार्थ्यांचा निकाल देण्याच्या हालचाली आता प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केल्या असून गुरुजींना निकाल तयार करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिले आहेत.
कोरोनामूळे शाळांचे दुसरे सत्र पूर्ण होऊ शकलेले नाही. मात्र, आकारिक मूल्यमान प्रक्रियेतील दुसरी चाचणी परीक्षा झालेली आहे. आता याच आधारावर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करण्यात येणार असुन यासाठी आकारिक गुणांना १०० गुणांच्या तुलनेत मोजण्यात येणार आहे. तत्पूर्वी शाळांची पहिली सत्र परीक्षा व संकलित मूल्यापान प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने याचा निकाल तयार करता येणे शक्य आहे. आता पाहिले पूर्ण सत्र व दुसऱ्या सत्रातील आकारिक मूल्यमापन यांची सांगड घालून एकूण निकाल पत्रक तयार होणार आहे. एकंदरीत शासनाच्या या निर्णयाने अनेक विद्यार्थी व पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.
दुसऱ्या सत्रासाठी १०० गुणात रूपांतरण करण्यासाठी आकारिक मूल्यापान प्रक्रियेतील गुण –
इयत्ता १ व २ – ७० गुण
इयत्ता ३ व ४ – ६० गुण
इयत्ता – ५ व ६ – ५० गुण
इयत्ता – ७ व ८ – ४० गुण.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे