सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप लोंढे यांचा कोरोनाने मृत्यू

पुणे, दि.४मे २०२०: पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे (वय ५७) यांचा कोरोना विरुद्ध लढताना मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र पोलीस महासंचालक व महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांप्रति हळहळ व्यक्त करत आहेत.

याबाबत ‘एनएनआय’ ने याबाबत अधिक माहिती दिली आहे की, लोंढे हे लॉकडाऊनमध्ये पोलीस बंदोबस्तावर कार्यरत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लोंढे यांना १२ दिवसांपासून व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते.
मात्र, आज ( सोमवारी) उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाला. त्यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली. कोरोनामुळे पुण्यात झालेला पोलीस दलातील हा पहिला मृत्यू आहे. असल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय लोंढे यांना उच्च रक्तदाब आणि स्थूलपणाचा आजार होता, अशी माहिती भारती रुग्णालयाचे उपवैद्यकीय संचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा