स्वप्न जगज्जेता बनण्याचे

प्रत्येक देश आपल्याकडे असणाऱ्या नॉलेज पॉवर,
इकॉनॉमिक कँडीशनस
आणि अणुबॉम्ब च्या पॉवर मुळे जगावर राज्य करायची स्वप्न बघत होता….

पण जगामध्ये एक देश कच्चा मालाचा पुरवठा करत करत एका वैशिष्ठ पातळी वर आला,आपल्या मालाचा काही एक टिकाव लागत नाही,आपला माल बेभरवशाचा आहे असा संदेश जगभर पसरवण्यात तो यशस्वी झाला देखील.
आधी जगज्जेत्या अमेरिके बरोबर ट्रेड वार करून त्याने तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली खरी पण प्रथमदर्शी कुणालाही ह्याची जाणीव झाली नाही पण कोरोना नावाचं अतिसूक्ष्म विषाणू ठरविलेल्याप्रमाणे आपल्या देशात छोटुसाक उद्रेक करून त्याची बाहेर देशात व्यवस्थित पाठवणी केली.

बघता बघता तिसऱ्या महायुद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,ठरल्याप्रमाणे युरोपियन देश हे टार्गेट होते कारण टक्कर देणारे देश असा त्यांचा उल्लेख होता. जगात एक नंबर आणि दोन नंबर च्या लेव्हल चे मेडिकल सर्व्हिसेस असणाऱ्या देशांची वाताहात झाली आणि बघता बघता तिसऱ्या महायुद्धाने रौद्र रूप धारण केले. तिसरे महायुद्ध जिथे शस्त्र, दारू गोळा, सैन्य किंवा लष्कराची अजिबातच गरज नाही म्हणजे प्रचंड प्रमाणात पैसा वाचला जीवित हानी झाली नाही
आणि प्रदूषण ही झाले नाही…

एकच तयार केलेला विषाणू…
पण इतकी जबरदस्त शक्ती त्याची की बघता बघता त्याने एक एक करून नुसते देश नाहीत तर आख्या जगाला स्तब्ध व्हायला लावले.

दुसऱ्या महायुध्दात जेव्हा अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी ह्या शहरांवर अनुहल्ले करून जी रक्तरंजित शांतता निर्माण करायचा प्रयत्न केला होता त्याच्या १००० पटीने जास्त अशी शांतता ह्या छोट्याशा विषाणू मुळे आपल्याला अनुभवायला मिळाली,आणि हो रक्तरंजित असे काहीच वर्गीकरण नाही,फक्त जीवितहानी आणि ते पण कदाचित दुपटीपेक्षाहो जास्त असावी.

अमेरिके सारखा देश हा फक्त स्वतःचा नंबर १ हा किताब मिरविण्यासाठी आणि इकॉनॉमिकल स्टेबल राहण्यासाठी अजूनही लॉकडाऊन करत नाही असे जरी दिसून आले तरीही भारत मात्र कशाचीही पर्वा न करता स्वतःला बंद करून घेण्यात यशस्वी झाला,कित्येक लाखो करोडोंचे नुकसान गेल्या एक महिन्यात झाले आहेत.
अजून किती होईल ह्याचाही अंदाज नाही आणि तो न लावलेलाच बरा,पण ह्या विषाणू मुळे सगळ्या देशांची झालेली वाताहात ही शब्दात व्यक्त होण्याच्या कैक पटीने पलीकडची….

विषाणू जरी असला तरी त्याने जे काही अमुलाग्र बदल हे माणसाच्या दैन्यदिन आयुष्यात केलेत ते खरच वाखाणण्याजोगेच.
म्हणजे सुरक्षित अंतर कसे ठेवावे,आवडत्या वस्तू, खाद्यपदार्थ, व्यसने किंवा सवयी ह्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही…
हे धादांत खोटे आहे हे सिद्ध केले.

पण एक असा घटक आहे जो कदाचित ह्या विषाणूच्या जन्मामुळे प्रचंड खुश झाला असावा… होय तो घटक म्हणजे आपला सभोवतालचा निसर्ग.
आज आपण घरात आहोत तर निसर्ग खरच सुटकेचा असा मोकळा श्वास घेत असेल. वायुप्रदूषण हे ९०% घटले आहे,सगळ्या नद्या अगदी एरियल ने धुवाव्यात इतक्या स्वच्छ झाल्या आहेत समुद्र किनारे इतके स्वच्छ झाले आहेत की तिकडे शोधून पण प्लास्टिक सापडेनासे झाले आहे.

इतकी स्वच्छता तर आपण ठरवून देखील करू शकलो असतो का..?? हा फार मोठा असा यक्ष प्रश्न.

ह्या विषाणूच आभार मानावे की त्याचा द्वेष करावा ही जर तर आणि ज्याची त्याची गोष्ट
पण इतके मात्र खरे की आपला एकही सैनिक न गमावता चीन ने हे तिसरे महायुद्ध जवळ जवळ जिंकला आहे,जगज्जेता.. होय हे चीनचे खूप मोठे आणि गेल्या तीन दशकात पाहिलेले स्वप्न आणि तो आता ह्या स्वप्नपूर्ती च्या जवळपास पोहोचला असावा देखील…

पुढील काही दिवसात जर चीनने अमेरिकन डॉलर ला त्यांच्या देशात बंदी केली
किंवा शांघाय शेअर मार्केट मध्ये असलेली डॉलर्स ची इन्व्हेस्टमेंट वर बंदी आणली तर अमेरिकेच्या डॉलर्स चे अद्धपथन होणार हे १००% सत्य
आणि हे असे झाले तर चीनला जगज्जेता व्हायची खूप मोठी संधी मिळेल…. आणि असे झाल्यास रशिया हा चीन ला बिनशर्त पाठिंबा देईल
आणि योगायोगाने भारतालाही ते सत्य स्वीकारावे लागेल….!!!

न्यूज अनकट वाचक: राहुल रोहिलकर – पुणे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा