तळीरामांची वाईन्स शॉप बाहेर लागली दीड किलोमीटर पर्यंत रांग

श्रीगोंदा,०४ मे २०२०: देशात आणि राज्यात नवीन लॉक डाउन घोषित झाले त्याच बरोबर नियमांमध्ये काहीशी शिथिलता ही देण्यात आली. यामध्ये ०४ मे रोजी सर्व दारूचे दुकाने राज्यात उघडली जाणारं हे जाहीर करण्यात आले होते. या निर्णयामुळे तळीरामांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते.

आज श्रीगोंदा तालुक्यातील सत्यम वाईन्स बाहेर तळीरामांची पाहाटे पासूनच रांग लावलेली पाहण्यास मिळाले. शासनाच्या सर्व नियमांना आणि सोशल डिस्टंसिंग ला धाब्यावर बसवून वाईन्स समोर तोबा गर्दी पाहण्यास मिळाली. कोणतेही नियम या ठिकाणी पाळण्यात आलेले नव्हते.

दारू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून लोका येतात असतात त्यातही कोणत्याही नियमांचे पालन त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे वाईन्स शॉप मधील कर्मचाऱ्यांना आणि मालकांना कोरोना विषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन त्या मुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा