“जलालपूर मध्ये सात नागरिकांना ठेवले विलगीकरण कक्षात”

कर्जत,०५ मे २०२०: कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड आणि वडगाव या ठिकाणांहून प्रवास करून आलेल्या सात नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या मध्ये तीन महिलांचा व चार पुरूषांच्या समावेश आहे.

पोलिस पाटील सांगळे यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की गावामध्ये बाहेरून येण्या-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून कलेक्टरांच्या आदेशानुसार १ मे पासून गावात येणा-या नागरिकांना गावातील शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. त्या नुसार १ मे नंतर आलेल्या गावातील सात नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

सांगळे म्हणाले कि आतापर्यंत १३३ नागरिक गावात आलेले आहेत. सर्व सुविधांनीयुक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. त्यामुळे सात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे ही सांगण्यास ते विसरले नाहीत. गावातील नागरिकांना या सुचना करण्यात आल्या आहेत कि जास्त वेळ कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये आणि जो व्यक्ती मास्क किंवा रुमाल न लावता घराबाहेर बाहेर सार्वजनिक ठिकाणी दिसेल त्यांस शिक्षा आणि दंडात्मक करवाईला सामोरे जावे लागले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा