पंढरपूरच्या विठ्ठल रुखुमाईला ३१०० हापूस आंब्यांची आरास

सोलापूर, दि.१० मे २०२०: संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नेत्रदीपक आंब्यांची आरास करण्यात आली आहे.

कोरोनाचे विश्वावर ओढावलेले संकट दूर करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी श्रीविठ्ठल भक्त अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर सेल हरीश बैजल, अजय सालुंखे उद्योगपती पुणे, उमेश भाई भुवा सांगली, दिपकभाई शहा सांगली, सुनिल उंबरे  या भक्तांकडून ही आंब्यांची पूजा अर्पण केली आहे.

श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास ३१०० रत्नागिरी हापूस आंब्यांनी व आंब्यांच्या पानांनी आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे. त्यामुळे गाभाऱ्यास मनमोहक असे आमराईचे स्वरूप प्राप्त झाले.

रत्नागिरी येथून खास मागविण्यात आलेल्या ३१०० हापूस आंब्यांने श्री विठ्ठलाचा गाभारा, चौखांबी आदी ठिकाणी आंब्याची आरास करण्यात आल्याने श्री विठ्ठल आमराईत उभा असल्याचा भास होत असून देवाचे हे लोभस रुप आज अधिकच खुलून दिसत आहे.

श्री विठ्ठला प्रमाणे श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात हि आंब्यांची मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा