इंदापुरातून मजूरांना घेऊन ५ गाड्या रवाना

इंदापूर,दि. ११ मे २०२०: कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने हाल झाले ते मजूरांचे. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील एका खासगी मंगल कार्यालयात जवळपास १०० हुन अधिक ऊसतोड कामगार आणि इतर मजूर होते. लॉकडाऊन वाढल्याने आणि हाती काम नसल्याने सर्वजण गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. परंतू यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर अडवल्यामुळे त्यांना इंदापूर येथील एका खासगी मंगल कार्यालयात ठेवण्यात आले होते इंदापूर प्रशासनाने आज दि. ११ मे रोजी त्यांची वैद्यकीय तपासणी करून १०० हून अधिक मजूरांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच गाड्यांमधून त्यांच्या जिल्ह्यात रवाना केले .

बस मध्ये देखील सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते एका बसमध्ये साधारणतः २० ते २२ लोक होते या प्रत्येकाची वैद्यकीय चाचणी करूनच त्यांना जाण्याची परवानगी दिली होती. तसेच उर्वरित मजूरांना सायंकाळी वैद्यकीय तपासणी करून सोडण्यात येणार आहे असे इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी न्यूज अनकट शी बोलताना सांगितले.

एकदाचे आपण आपल्या घरी जाणार असल्याने मजूरांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद होता. त्यांना जाताना इंदापूर येथील प्रशांत शिताप आणि त्यांच्या सहकार्यांनी जेवणाचे पॅकेट्स दिले.

यावेळी तालुक्यातून बस सोडताना इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, वैद्यकीय अधिकारी मिलिंद यादव, सार्वजनिक बांधकाम अभियंता धनंजय वैद्य आणि इतर महसूल आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा