मंचर, दि. १४ मे २०२०: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या बाजूला असलेल्या धोबीमळा येथे वास्तव्यास असलेल्या फासेपारधी समाजाच्या व्यक्तींने दारूच्या नशेत चक्क राहत्या झोपड्या जाळल्याची घटना घडली आहे. परंतू या आगीत कोणतीही दुर्घटना घडली नाही मात्र या आगीत संसार साहित्य जळून खाक झाले आहे.
दारूची दुकाने उघडी झाल्याने अनेक दिवसापासून घरात बसलेले तळीराम बाहेर पडत दारू पित आहेत. मात्र, या दारुड्यांमुळे नाहक दुसऱ्यांना त्रास होत आहे मंचर येथील धोबीमळा येथे वास्तव्यास असणाऱ्या फासेपारधी समाजाच्या व्यक्तींने दारूच्या नशेत आपल्याच झोपडीला आग लावून पेटवून दिली आहे व नंतर ही व्यक्ती मोबाईल मध्ये आपल्या जळालेल्या झोपडीचे मोबाईलमध्ये शूटिंग काढत राहिली. यात त्यांची झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली असून त्याच्या झोपडीतील संसारोपयोगी वस्तू जळून गेल्या आहेत. तसेच या आगीमुळे त्याच्या बाजूला असलेल्या त्याच्या भावाच्या दोन झोपडीला आग लागून त्याही पूर्ण जळून गेले आहेत. आग लागली तेव्हा झोपडीतील महिला व लहान मुले बाहेर आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
या घटनेबाबत माहिती मिळताच मंचर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन आगीची पाहणी करून पारधी समाजाला समज दिली. या व्यक्तींनी किंवा त्यांच्या समाजातील इतर व्यक्तींनीही पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार नोंदवली नसल्याने पुढील कारवाई झाली नाही.
न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे